कोमट पाणी

 सध्या मि कोमट पाणी पितो

अलार्म लाऊन ठेवतो

दर दहा मिनीटानी

मि कोमट पाणी पितो

चहा प्यायच्या आधी

आणि जेवतानापण 

मि कोमट पाणी पितो

खुप गरम होतय

अहो अे सी लाऊन बसतो

पण तहान लागली

कि मि कोमट पाणीच पितो

मि टेरेसवरती जातो

झाडांकडे नजर टाकतो

कोणाच लक्ष नाही पाहुन

दोन तुळशीची पान मटकावतो

आत येऊन दोन लवंगा चघळतो

 मि कोमट पाणी पितो

मि तुळशीचा काढा घेतो

रात्री हळद दुध घेतो

त्या आधी गुळण्या करतो

मि कोमट पाणी पीतो

बाथरुम मधुन बाहेर येतो

अल्याचा तुकडा चावता चावता

एक लवंग एक मिरी चघळतो

थोडस तिखट वाटत म्हणुन

पुन्हा कोमट पाणी पितो

मग मि लिंबु पाणी पण घेतो

फक्त लिंबु फ्रिजमधल

आणि पाणी कोमट घेतो

मि कोमट सरबत पितो

मि आंबट खात नाही

श्रिखंड फेकुन देतो

साठवलेली बासुंदी

गरम करुन कोमट कोमट पितो

वरती कोमट पाणी पितो

मि मास्क बांधुन झोपतो

मि हात बांधुन फिरतो

गाल नाक खाजवायसाठी

जवळ मोरपिस ठेवतो

मि कोमट पाणी पितो

मि पंतप्रधानांच ऐकतो

मि मुख्यमंत्र्यांच ऐकतो

आमचा पण गुरखा मला सांगतो

शाबजी मै रात्रभरी गली गली घुमतो

मला करोना नै दिशतो

तुमी तर ऐसेच घाबरतो

मै साथमे थर्मास रखको

रातभर कोमट पानी पितो

मेरेको करोना नाही दिशतो


प्रसन्न रामजोशी







Comments