Posts

Showing posts from August, 2020

कोमट पाणी

 सध्या मि कोमट पाणी पितो अलार्म लाऊन ठेवतो दर दहा मिनीटानी मि कोमट पाणी पितो चहा प्यायच्या आधी आणि जेवतानापण  मि कोमट पाणी पितो खुप गरम होतय अहो अे सी लाऊन बसतो पण तहान लागली कि मि कोमट पाणीच पितो मि टेरेसवरती जातो झाडांकडे नजर टाकतो कोणाच लक्ष नाही पाहुन दोन तुळशीची पान मटकावतो आत येऊन दोन लवंगा चघळतो  मि कोमट पाणी पितो मि तुळशीचा काढा घेतो रात्री हळद दुध घेतो त्या आधी गुळण्या करतो मि कोमट पाणी पीतो बाथरुम मधुन बाहेर येतो अल्याचा तुकडा चावता चावता एक लवंग एक मिरी चघळतो थोडस तिखट वाटत म्हणुन पुन्हा कोमट पाणी पितो मग मि लिंबु पाणी पण घेतो फक्त लिंबु फ्रिजमधल आणि पाणी कोमट घेतो मि कोमट सरबत पितो मि आंबट खात नाही श्रिखंड फेकुन देतो साठवलेली बासुंदी गरम करुन कोमट कोमट पितो वरती कोमट पाणी पितो मि मास्क बांधुन झोपतो मि हात बांधुन फिरतो गाल नाक खाजवायसाठी जवळ मोरपिस ठेवतो मि कोमट पाणी पितो मि पंतप्रधानांच ऐकतो मि मुख्यमंत्र्यांच ऐकतो आमचा पण गुरखा मला सांगतो शाबजी मै रात्रभरी गली गली घुमतो मला करोना नै दिशतो तुमी तर ऐसेच घाबरतो मै साथमे थर्मास रखको रातभर कोमट पानी पितो मेरेको कर...